Surprise Me!

सईने ताम्हणकर आहे बातम्यांमध्ये | मनोरंजनाची मजेशीर माहिती आता मराठीत | Marathi News

2021-09-13 14 Dailymotion

मराठी सिनेसृष्टी आशयघन चित्रपटांसाठी ओळखली जात असली तरी मराठीने तितकंच ग्लॅमरसही होऊन दाखवलं आहे. राधिका आपटे, सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, अंजली पाटील, सोनाली कुलकर्णी आशा अनेक अभिनेत्रींनी आपलं ग्लॅमर जपलं आणि वाढवलं. या नायिका हिंदीतही झळकताहेत. म्हणूनच त्यांच्या बारीकसारीक बाबींकडे चाहत्यांच लक्ष असतं. यात सर्वात आघाडीवर आहे ती सई ताम्हणकर. ती काय करते, कुठे जाते,, कोणता ब्रॅंड प्रमोट करते याकडेही मीडीयाचं लक्ष असतं. मात्र आज सई चर्चेत आली ती तिच्या इन्स्टा पोस्टमुळे. या पोस्टमुळे तिची मैत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.<br /><br />सईने आपल्या एका मित्राला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पण त्या देताना तिने वापरलेली कॅप्शन मात्र अनेकांचं लक्ष वेधून घेते आहे आणि त्या मित्राबद्दल उत्सुकताही वाढवते आहे. अर्थात या दोघांचे फोटो सतत सोशल मीडीयावर पडणं नवं नाही. होळी असो, रंगपंचमी असो सईने त्याचे फोटो शेअर केले आहेत. शिवाय त्यानेही सईसोबतचे अनेक फोटो आपल्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केले आहेत. या मित्राचं नाव आहे घनश्याम लालसा. हा काय करतो, कुठे राहतो ते मात्र अद्याप सईने कुठेच सांगितलेले नाही. पण मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार तो थिएटर आर्टिस्ट आहे<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon